🔥 ट्रेंडिंग बांसवाड़ा के कुवाडीया गाँव में चीता को... ग्राम पंचायत मुटकी में उत्साह के साथ म... 6 ਸਾਲ ਬਾਅਦ ਪਤੀ ਤੋਂ ਤਲਾਕ ਲਵੇਗੀ ਸਪਨਾ ਚੌਧ... পোড়াডাঙ্গা রেলস্টেশনের অদূরে অজ্ঞাতপর... उझानी में अज्ञात व्यक्ति ने फौजी पर गो... हनुमानगढ़ की बेटी पलक का राष्ट्रीय शूट...
23 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

भोर पंचायत समिती कार्यालयात जादूटोण्याचा प्रकार; लिंबू अंगाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या टेबलावर धमकीची चिठ्ठी

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 23 नव. 2026, 01:38 PM 👁 147
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोर पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलावर लिंबू, हळद-कुंकू, गुलाल आणि धमकीची चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कार्यालयात जादूटोण्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

भोर येथील पंचायत समिती कार्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिकाऱ्यांच्या टेबलावर लिंबू कापून त्यावर हळद-कुंकू आणि गुलाल टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या लिंबाखाली एक धमकीवजा चिठ्ठी देखील ठेवण्यात आली आहे.

पंचायत समिती कार्यालयात असा जादूटोण्याचा प्रकार प्रथमच समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.

या घटनेचा सविस्तर आढावा आमचे भोरचे प्रतिनिधी किरण अंबिके यांनी घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील, यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
📲Get App