🔥 ट्रेंडिंग बीड जिले में किसानों का ज्वार मूल्य वि... भेमराज़ सेना ने कंजि गांव के हनुमंत भो... आज है करणी माता परिक्रमा திருச்சுழி சாலை சேதம்: தூசி சுகாதார அப... रश्मिका मंडणा ने बताया पति विजय देवरेक... गेलर और प्रिंज़ जूनियर की बेटी ने अभिन...
22 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

भोंगवली सबस्टेशन प्रकल्पावरून संग्राम थोपटे आक्रमक; सरकारला सवाल, प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप! प्रशासन बेजबाबदार

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 22 नव. 2026, 05:07 PM 👁 51
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर, पुणे :- भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित हायव्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवरलाईन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी मानवी साखळी आंदोलन करत आपला तीव्र विरोध दर्शविला. या आंदोलनादरम्यान सबस्टेशन हटाव कृती समितीचे अध्यक्ष तथा भाजप नेते संग्राम थोपटे यांनी सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
भोंगवली गावाचा या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध असून, यापूर्वी अनेकवेळा विविध आंदोलने करून विरोध दर्शविण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या वतीने प्रकल्पासाठी पर्यायी जागेचाही प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरूच असल्याचे थोपटे यांनी सांगितले.
भोरच्या प्रांताधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या जागेसाठी खासगी जमिनीतून रस्ता देण्याचा आदेश काढल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत वन विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, २५ दिवसांच्या उत्खनन परवानगीच्या नावाखाली अनेक महिने उत्खनन करण्यात आले असून, ५० ब्रासपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत महसूल विभागाने अद्याप कारवाई केलेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकल्पासाठी खांबांवर आकडे टाकून वीज चोरी करण्यात आल्याचा तसेच कृषी विभागाचा बंधारा बुजविण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.
"सत्ताधारी पक्षात असूनही सरकार या प्रकल्पाबाबत एवढे मेहरबान का?" असा सवाल उपस्थित करत चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने प्रशासनावर दबाव आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंदोलनस्थळी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत न्याय मागायचा कुणाकडे, असा सवालही त्यांनी केला.
मानवी साखळी आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामस्थांची एकजूट दाखवून दिली आहे. यापुढेही चुकीच्या पद्धतीने प्रकल्पाचे काम सुरू राहिल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संग्राम थोपटे यांनी दिला.
📲Get App