🔥 ट्रेंडिंग सुरक्षित आहार, हमर अधिकार अभियान: गौरे... ବାତ୍ୟାକୁ ନେଇ ହାଇଆଲର୍ଟରେ ଭୁବନେଶ୍ୱର ଏୟାର... कलेक्टर विजय दयाराम ने 44 प्रतिभागियों... ବାତ୍ୟା ପୂର୍ବରୁ ପୁରୀରେ ଜୋରଦାର ପ୍ରସ୍ତୁତି... कल्याणपुरा ब्लॉक नंबर 2 में खिला कमल,... नई गीत 'आवध के राम चले' रामायण का जश्न...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

अवकाळी पावसाने भोर तालुक्यातील झेंडू फुलांना धक्का, शेतकरी चिंतेत

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 03 नव. 2026, 06:42 PM 👁 153
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गेल्या काही दिवसांपासून भोर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झेंडू फुलांचे नुकसान झाले असून, दिवाळीच्या सणात बाजारपेठेत मागणी असलेल्या या फुलांच्या शेतकऱ्यांना मोठी चिंता वाटत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतांमध्ये पाणी साचले, ज्यामुळे झेंडू फुलांना मोठे नुकसान झाले.

झाडांवर उमललेल्या फुलांना पावसाच्या पाण्यात भिजल्याने आणि दमट वातावरणामुळे ती काळी पडून सडू लागली.

दिवाळीच्या सणात बाजारपेठेत झेंडू फुलांची मोठी मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या आशेने लागवड केली होती, परंतु पावसामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत.

बळीराजा हवालदिल झाला आणि त्यांनी सांगितले की हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाकडून हिरावला जात असल्याने शेतकरी अधिक तणावात आहेत.
📲Get App