🔥 TRENDING % ઈન્ક્રીમેન્ટ, 5 પ્રમોશન અને 15 લાખનો... कल्याणपुर क्रॉसिंग के हालात दिन-ब-दिन... स्वास्थ्य मंत्री निशांत कुमार ने पटना... Hemant Calls on Jharkhand Youth to Dri... Jharkhand Mukti Morcha delays decision... बांका जिले के चांदन में बीआरसी भवन पर...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Travel

अपघात रोखण्यासाठी मुरबाड पोलिसांची धडक मोहीम; कल्याण-अहिल्यानगर महामार्ग व म्हसा रोडवर चोख पोलीस बंदोबस्त आणि कडक तपासणी.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 28 Nov 2026, 11:31 PM 👁 25
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २९/११/२०२६
विशेष वार्ता पत्र
ठाणे मुरबाड: सण-उत्सव, गर्दीचे दिवस आणि कल्याण-अहिल्यानगर महामार्ग तसेच म्हसा रोडवरील दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेता, संभाव्य रस्ते अपघात रोखण्यासाठी मुरबाड पोलिसांकडून विशेष वाहतूक सुरक्षा आणि नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली आहे. केवळ अपघात घडल्यानंतर घटनास्थळी धाव घेणे एवढीच पोलिसांची जबाबदारी नसून, अपघात होऊच नयेत यासाठी आगाऊ खबरदारी घेणे हे देखील कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे, या भावनेतून मुरबाड पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे प्रवाशांकडून व स्थानिक नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
चोख पोलीस बंदोबस्त आणि नियोजन:
या मोहिमेसाठी मुरबाड पोलीस प्रशासनाकडून अतिशय कडेकोट आणि नियोजनबद्ध पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. लाड यांच्या अधिपत्याखाली तसेच मुरबाड पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर साहेब यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली होती.
कल्याण-अहिल्यानगर महामार्ग आणि म्हसा रोडवरील महत्त्वाच्या चौकांमध्ये, वळणांवर आणि गर्दीच्या ठिकाणी ठिकठिकाणी 'डायरी गेट' (बॅरिकेड्स) उभारून नाकाबंदी करण्यात आली. रात्रीच्या वेळी तसेच गर्दीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि अपघात टळावेत यासाठी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून वाहतुकीचे योग्य नियंत्रण करत होते. संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात असल्याने संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा दरारा आणि शिस्त पाहायला मिळाली.
बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले:
या तपासणी मोहिमेदरम्यान प्रामुख्याने मद्यपान करून वाहन चालविणारे (ड्रंक अँड ड्राइव्ह), एकाच दुचाकीवरून तिघांनी (ट्रिपल सीट) प्रवास करणारे, भरधाव वेगाने वाहन चालविणारे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या कडक नाकाबंदीमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, महामार्गावरील व म्हसा रोडवरील वाहतुकीला मोठी शिस्त लागल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवाशांनी व स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांच्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
वाहनचालकांना पोलिसांचे कळकळीचे आवाहन:
या बंदोबस्तादरम्यान मुख्य पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर साहेब यांनी सर्व नागरिकांना व वाहनचालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे:
• मद्यपान करून कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवू नये.
• एकाच दुचाकीवर तीन प्रवासी (ट्रिपल सीट) बसवून प्रवास करू नये.
• महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवर वेगमर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे.
• दुचाकी चालवताना स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःसह इतरांचाही प्रवास सुरक्षित करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुरबाड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App